🔘अध्यात्म व विज्ञानाच्या पलीकडे 🔘
💝 बुद्ध हे एक विज्ञानिक होते ,त्यांनी वैशाखी पौर्णिमेला जी ज्ञान प्राप्ती केली ती विज्ञानिक होती ,ज्यामध्ये त्यांनी पुऱ्या ब्रम्हांडाचे गुपित स्पस्ट केले ,असा शोध काढला कि अजूनही विज्ञानिक वर वरच घिरट्या मारत आहेत ....पण बुद्धांनी मात्र साध्य केलं ,बुद्धांनी नित्य निर्वाण शोधून काढले व ते सर्वज्ञ झाले ,बुद्ध झाले ....विज्ञान व बुद्ध सारखेच आहे पण वैज्ञानिक बुद्धपर्यंत पोचत नाहीत कारण ते वास्तुमात्राच्या साहाय्याने शोध करत आहेत ते श्यक्य नाही
💝 आपल्या मिल्क वे आकाशगंगेत 200 अब्ज तारे असावेत असा शास्त्रिय अंदाज आहे ., त्या पैकी किती ग्रहांवर प्रगत बुध्दिमत्ता असेल ? बुद्ध सांगतात मोजू शकत नाहीत किती तारे आहेत ते ,त्याची गिणती करू शकत नाही , पण त्याचे विभाजन करू शकतो ...आणि समजू शकतो ,कितीही तारे अस्तित्वात असले तरी ते धातुमय आहेत , पण अनित्य आहेत ,पृथ्वी धातू ,जल धातू व अग्नी धातू आणि वायू धातू ने हे तारे बनले आहेत ....
परग्रहावर प्रगत मानवी बुध्दिमत्ता आहे का ? खूप आहेत ,प्रत्येक ब्रम्हाडाच्या पद्धतीत वेगवेगळ्या धातूचे लोक आहेत ...31 लोकांनी एक ब्रह्मांड बनते आणि हे पूर्ण ब्रह्मांड अनित्य आहे ,दुखमय आहे ....आणि काळाच्या गतीमध्ये अडकला आहे
प्रगत बुध्दिमत्ता असलेला सजीव हे सजीव इतक्या प्रगाढ मेंदूचे आहेत की आपण त्याचा विचार करू शकत नाही पण कितीही हुशार असला तरी प्रज्ञा नसल्याने त्या नित्य निर्वाणपर्यंत पोचू शकत नाहीय
💝कारण हे पूर्ण ब्रम्हांड मग त्यात अनेक आकाशगंगा आल्या ह्या धातुमय आहेत पण अनित्य आहे ,सतत बदलत असतात ..म्हणजे बघा दरवर्षी नव्याने जन्म घेणारे तारे ( आपल्या आकाशगंगेत दर वर्षी नव्याने 10 तारे जन्म घेतात )
म्हणजे निर्माण झालेल्या ता-यापैकी ग्रहमालिका असू शकणा-या ता-यांचा अंश
म्हणजे ग्रहमालिकेच्या ज्या ग्रहावर जीवनाच्या विकासासाठी योग्य वातावरण असणाऱ्या ग्रहांचा अंश
म्हणजे सुयोग्य ग्रहावर जीवन विकसित होण्याची शक्यता पण प्रत्येक आकाश गंगे तील एकच ग्रह म्हणजे पृथ्वी मनुष्य लोक असू शकते ...ती एक शृंखला आहे ,निसर्गाची ..पण विज्ञानिक असे समजतात कि एका आकाशगंगेतच दुसरी पृथ्वी असू शकते .... पण प्रत्येक आकाशगंगेतील मधला ग्रह एकच होऊ शकतो भले 200 अब्ज तारे असले तरी सूर्य आपल्या मिल्की वे मधील मधला तारा आहे म्हणून तिथे मानवनिर्मित ग्रह पृथ्वी आहे ...
दुसऱ्या आकाशगंगेत माध्यस्थानी असलेल्या ताऱ्यामध्ये पृथ्वी असू शकते ...
म्हणजे जीवन विकसित झाल्यावर प्रगत बुध्दीमत्तेच्या पातळीपर्यंत उत्क्रांत होण्याची शक्यता म्हणजे स्वतः बुद्ध होय ...बुद्धांनी फक्त बुद्धिमत्ताचा नाही तर प्रज्ञा जागविले आणि स्वानुभवाने ब्रह्मडपालिकडील निर्वाण शोधले पण त्या आधी त्यांनी अनित्य जगातील वेगवेगळे उत्क्रांत बुद्धिमत्तेचे लोक शोधले ....31लोक हे हि एक उत्क्रांती आहेच ...बुद्धांनी एका आकाशगंगेत म्हणजे 31 लोकांतील ब्राम्हडात वेगवेगळे लोक जरी शोधले तरी त्यांनी त्या लोकांना मनुष्यलोक म्हंटले नाही तर त्या त्या वेगवेगळ्या गृहातील लोकांना त्यांनी तेथील जगातील लोक त्यांना ज्या नावाने हाक मारत तीच नावे दिली .....
बुद्धांनी ह्या अनित्य लोकातील जे वेगवेगळे लोक आहेत त्याची एक श्रुखाला केली ...त्याला कोंडण्य असे नाव दिले ...ज्यात 4 दुर्घतीच्या योनी , 1 मनुष्यलोक ,6देवलोक ,16रूप ब्रह्मलोक आणि 4 अरूप ब्रह्मलोक ....प्रत्येक आकाशगंगेत ह्याच पद्धतीने अनित्य जग तयार होते नष्ट होते,त्या कार्यकारी भावाला प्रतित्य समुत्पाताचा सिद्धांत हे नाव दिले ...कोणतीही गोष्ट कारणाशिवाय होत नाही ...
ह्यालाच प्रतित्ये समुत्पाद म्हणाले जाते..... याच सिध्दांताच्या आधारे भगवान बुध्दाने सृष्टीचा निर्माता म्हणून इश्वराला नाकारले. तसेच ईश्वराच्या अस्तित्वाला व आत्म्याच्या स्वतंत्र अस्तित्वाला सुध्दा नाकारले. कोणीही जग शून्यातून निर्माण करु शकत नाही व कोणतीही गोष्ट शून्यातून निर्माण होत नाही तर ती कारणाने निर्माण होत असते. त्यामुळे सृष्टीचा निर्माता ईश्वर, देव वगैरे सर्व कल्पना खोट्या आहे. सर्व विश्व प्रतित्यसमुत्पाद म्हणजे कार्यकारणभावाच्या सिध्दांतावर आधारलेले आहे.
भारतीय संस्कृतीत ईश्वराचा व आत्म्याचा संबंध धर्माशी जोडला आहे. भगवान बुध्दाने मानवाच्या प्रगतीसाठी व विकासासाठी ईश्वर आणि आत्मा यांचा धर्माशी जोडलेला संबंध नाकारला. वासेठ्ठ आणि भारद्वाज या ब्राम्हणाशी झालेल्या चर्चेत बुध्दाने ईश्वराविषयी त्यांचे मत स्पष्ट केले आहे. बुध्दाच्या मते या जगात खूनी, चोर, डाकू, लुटारु, व्यभिचारी, व्यसनी, फसवे, असे अनेक तर्हेचे लोक असतात. जर ईश्वर सर्वज्ञ, सर्वशक्तीमान आणि सर्वव्यापी आहे तर तो एकतर या सर्व गोष्टीमध्ये तोच विद्यमान आहे अथवा अशा अनिष्ट गोष्टीचा तो पुरस्कर्ता तरी आहे. असेही नसेल तर अशाप्रकारचा ईश्वर आंधळा तरी आहे. सृष्टी ही ईश्वरनिर्मित नसून ती उत्क्रांत झाली आहे असे त्यांचे ठाम मत होते. भगवान बुध्दानी ईश्वराचे स्थान `सदाचार व नितिला ’ दिले आहे.
भगवान बुध्दाने पुनर्जन्माला अवतार (Incarnation) म्हणून नाही तर पुनर्निमिर्ती म्हणून मानले. त्यानी शरीराचे चार घटक म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वायू यांचे पुनर्जन्म मानले, आत्म्याचे नाही.
आणि हे सर्व मानवाच्याच प्रज्ञे ने कळते कारण त्यात निर्वाणाची किंवा शुन्यतेच्याही पलीकडे जे विश्व आहे त्यातील एक अश म्हणजे बोधी अंग जे सर्वांच्यात असते त्याला म्हणतात प्रज्ञा किंवा बोधी अंग ..हीच प्रगत बुद्धिमत्ता होय
प्रगत बुध्दिमत्ता म्हणजे नक्की काय ??प्रत्येक जल्मी जी बुद्धी तो वाढवितो ती प्रगत बुद्धी नसून प्रज्ञा म्हणजे प्रगत बुद्धी होय ...!!म्हणजे एखादया वेक्तीचे मरण झाले तर ती बुद्धी नष्ट होते म्हणजे बुद्धी कितीही प्रगत असली तरी ती शरीराच्या वर अवलंबून असते पण प्रज्ञा हि बोधी चे अंग असल्याने बुद्धी ला लागून विवेक असावा म्हणजे प्रज्ञा असावी ,हा शोध खूप महत्त्वाचा आहे ....मेल्यावरही चित्ताच्या स्कंधात प्रज्ञा राहतेच
जसे ता-याचे व त्या ग्रहाचे आयुर्मान ठरलेले असते तसे पुऱ्या ब्रम्हांडाचे ठरलेलं असते पण बोधी हि सत्वाबरोबर असते अनेक जल्म जोपर्यंत ह्यातुन मुक्त होत नाही तोपर्यत
भौतिक मुलद्रव्या पासून जैविक रसायने व त्यापासून निर्माण झालेले जीवाणू अमिबा ते प्रगत मानवी बुध्दिमत्ता हा उक्रांतीचा टप्पा गांठण्यासाठी पृथ्वीला 3.50 अब्ज वर्ष वेळ लागला .. यालाच उत्क्रांती म्हणतात आकाशगंगेला 15 अब्ज उक्रांतीसाठी वेळ लागलाय ....पण सारे अविद्येनी आणि निसर्गाच्या प्रतित्य समुत्पाद च्या सिद्धांताने होत असते
सिध्दांतानुसार अविद्येमुळे संस्कार उत्पन्न होतात, संस्कारामुळे विज्ञान, विज्ञानामुळे नामरुप (मन आणि शरीर), नामरुपामुळे षडायतन (सहा ईद्रीये), षडायतनामुळे स्पर्श, स्पर्शामुळे वेदना, वेदनेमुळे तृष्णा, तृष्णेमुळे उपादान (चिकटून राहणे), उपादानामुळे भव (होणे), भवमुळे जाती (जन्म), जातीमुळे जरा (वार्धक्य), मरण, शोक उत्पन्न होतात. अशा तर्हेने अविद्येपासून ते जरा, मरण पर्यंत दु:खाचा उगम होणार्या बारा कड्यांना अनुलोम प्रतित्यसमुत्पाद असे म्हणतात. दु:खाचा उगम कसा होतो हे अनुलोम प्रतित्यसमुत्पादमध्ये सांगितले आहे. . ह्याच मुले कितीतरी विस्वे उत्तपन्ह होतात व नष्ट होतात ....
💝 खरे तर कितीतरी वेळा अशा आकाश गंगा नष्ट झाल्या तरी पुनजल्म व कर्माचा विपाक मनुष्याला सोडत नाही ,ब्रम्हांड उपन्ह होते नष्ट होते पण सत्वाचे कर्म त्याला त्या त्या स्तितीतील लोकात जल्म मृत्यू च्या जंजाळात अडकलेला असतो
No comments:
Post a Comment