Tathagat Gautam Buddha Greates Thought in Marathi
सहवास हा कितीही दीर्घकाळ टिकला तरी कालावधीने त्यांचा शेवट हा होतोच.
- तथागत बुद्ध
मनात क्रोधभावना ठेवू नका. वैरभाव विसरा व आपल्या शत्रुलाही प्रेमान जिंका
- तथागत बुद्ध
वैराने वैर शमत नाही, वैरावर प्रेमानेच मात करता येते.
- तथागत बुद्ध
दुष्ट वासनांवर मनाचा पहारा ठेवणे हे सम्यक स्मृतीचे दुसरे नांव आहे.
- तथागत बुद्ध
Buddha motivation sentence and Whatsap status imagine in English
द्वेषाने द्वेष शमत नाही, तो फक्त क्षमाशीलतेनेच शांत होऊ शकतो.
- तथागत बुद्ध
व्यक्तीगत शुद्धी हा जगातील चांगल्या गोष्टीचा पाया आहे.
- तथागत बुद्ध
तुमचा आनंद बाह्य वस्तूंवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वत:च्या मनावर अवलंबून ठेवा. असे कराल तर तुमची किर्ती चिरकाल टिकेल.
- तथागत बुद्ध
मनात दुष्ट विचार असतील तर माणसाचे विचार, माणसाचे शब्द आणि कार्येही दुष्ट बनतात.
- तथागत बुद्ध
माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावर अवलंबून नसून त्याच्या अंगच्या योग्यतेवर अवलंबून आहे.
- तथागत बुद्ध
राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजा धार्मिक होते.
- तथागत बुद्ध
ज्याला कटू शब्दाने राग येत नाही तोच सर्वोत्कृष्ठ सुसंस्कृत मनुष्य होय.
- तथागत बुद्ध
आरोग्य ही सर्वश्रेष्ठ देणगी आहे.
- तथागत बुद्ध
समाधान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे.
- तथागत बुद्ध
विश्वास हे सर्वश्रेष्ठ नातं आहे.
- तथागत बुद्ध
निर्वाण हे सर्वश्रेष्ठ सुख आहे.
- तथागत बुद्ध
कर्तव्यासाठी कधीच अयोग्य वेळ नसतो.
- तथागत बुद्ध
माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचा मार्ग म्हणजे पंचशील होय.
- तथागत बुद्ध
"जेथे दारिद्र्य आणि दुःख आहे तेथे पुरवून ते दूर करण्यासाठी करूणा आवश्यक आहे.
- तथागत बुद्ध
निस्वार्थपणे करावयाच्या कार्यासाठी निष्कामभावाची आवश्यकता आहे.
- तथागत बुद्ध
केवळ मानवाविषयीच नव्हे तर सर्व प्राणिमात्रांविषयी बंधुभाव वाटणे हा मैत्रीचा अर्थ आहे.
- तथागत बुद्ध
समज आणि बुद्धी हेच प्रज्ञेचे दुसरे नांव आहे.
- तथागत बुद्ध
Dr. Babasaheb Ambedkar ke Vichar
आपल्या हातून दुष्कृत्ये होऊ नयेत म्हणून आपण आपले विचार तपासून पाहिले पाहिजे, कारण आपण जे पेरतो तेच आपल्याला मिळते.
- तथागत बुद्ध
निब्बाणप्रत पोहचण्यास पुरूषांइतक्या स्त्रियासुद्धा समर्थ आहेत.
- तथागत बुद्ध
सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सर्वात मौल्यमान धन म्हणजे संतोष.
- तथागत बुद्ध
जर मनुष्य स्वतंत्र नाही तर माणसाला अस्तित्वाचे प्रयोजन काय? तो जर दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवू लागला तर त्याच्या बुद्धीचा उपयोग काय?
- तथागत बुद्ध
जो राखून बोलतो, विचारांचा संयम करतो. जो आपल्या देहाने दुस-याला उपद्रव करीत नाही, असा मनुष्य निब्वाण मिळवू शकतो.
- तथागत बुद्ध
प्रथम स्वत:ची सन्मार्गावर स्थापना करावी. मग दुस-याला त्याचा उपदेश करावा. शहाण्या माणसाने स्वत:ला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये.
- तथागत बुद्ध
जग ही एक अंधारकोठडी असून मनुष्य हा तिच्यातील एक कैदी आहे.
- तथागत बुद्ध
जो मनुष्य परदोषच पाहात राहतो आणि स्वत:चे दोष उघड होताच चिडू लागतो त्याचे दोषविकार वाढतात आणि तो त्या विकारांच्या विनाशापासून दूरदूर जात राहतो.
-तथागत बुद्ध
फार बोलतो एवढ्यावरून कोणीही पंडित ठरत नाही. जो क्षमाशील आहे, जो द्वेष आणि भय यांच्यापासून मुक्त झाला आहे तोच पंडित होय.
-तथागत बुद्ध
तो मला अपशब्द बोलला, त्याने मला वाईट रितीने वागविले, त्याने माझ्यावर कुरघोरी केली, मला लुबाडले असे विचार ज्याच्या मनात वावरत असतात, त्याचा क्रोध विकार कधीच शमत नाही.
-तथागत बुद्ध
जीवनप्रवासाला स्वत:हून श्रेष्ठ किंवा स्वत:च्या योग्यतेचा पुरूष भेटला नाही तर त्याचे निग्रहाने एकलेपणानेच प्रवास करावा परंतु मुर्खाचा सहवास मात्र कधीही करू नये.
-तथागत बुद्ध
ज्याप्रमाणे सोनार क्षणाक्षणाने रूप्यातील हिण कणाकणाने जाळून टाकतो त्याप्रमाणे बुद्धिमान मनुष्य क्षणाक्षणाने चित्ताचा मळ थोडा थोडा नाहीसा करतो.
-तथागत बुद्ध
आपण जे काही आहोत ते आपल्या विचाराचा परिणाम आहे. ते सर्व आपल्या विचारावर अधिष्ठित आहे आणि आपल्या विचाराचेच बनलेले आहे.
-तथागत बुद्ध
जो स्तब्ध बसतो त्याला लोक दुषण लावतात. जो फार बोलतो त्याला लोक दुषण लावतात आणि जो अगदी थोडे बोलतो त्यालाही दुषण लावतात. खरोखर, ज्याला दुषणच लावले जात नाही असा या जगात कोणीच नाही.
-तथागत बुद्ध
चंदन, धूप, कमळ, मधुमालती यांच्या सुगंधापेक्षा शीलाचा सुगंध अधिक असतो.
-तथागत बुद्ध
माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे. प्राणिमात्रांवर हृदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता आहे.
-तथागत बुद्ध
हजारो निरर्थक शब्दाच्या तुलनेत, जे ऐकल्यामुळे मनशांती मिळते ते एक वाक्यच अधिक उपयुक्त आहे.
-तथागत बुद्ध
आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे.
तथागत बुद्ध
चमेलीची वेल सुकलेल्या फुलांचा त्याग करत असते, त्याच प्रमाने सर्वांनी काम आणि द्वेषचा त्याग करायला हवा.
--तथागत बुद्ध
सत्य आणि खरेपणाच आपणाला वाईट वागण्यापासून थांबवू शकतो.
-तथागत बुद्ध
स्वतःवर विश्वास ठेवा. दुसऱ्या कोणाचेही अंकित होऊ नका.
-तथागत बुद्ध
एक शत्रू दुसऱ्या शत्रूचे जेवढे नुकसान करतो, त्यापेक्षा अधिक नुकसान वाईट मार्गावर लागलेले चित्त करते.
-तथागत बुद्ध
ज्याप्रमाणे उकळत्या पाण्यात आपली प्रतिमा आपण पाहू शकत नाही, त्याप्रमाणे संतप्त होऊन आपण आपले भले करू शकत नाही.
-तथागत बुद्ध
सत्याच्या मार्गावर दोन चुका होऊ शकतात. एक म्हणजे हा प्रवास अर्धवट सोडणं आणि दुसरी तो सुरूच न करण.
-तथागत बुद्ध
क्रोधाला शरण जाण्यापेक्षा त्याच्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करा.
- तथागत बुद्ध
माणसाचं मन सर्वंश्रेष्ठ असतं, मन जसा विचार करत; तसच आपण घडतो.
- तथागत बुद्ध
आपले व्यक्तिमत्त्व आपल्या विचाराप्रमाणे घडत असते.
- तथागत बुद्ध
भूतकाळात रमू नका. भविष्याच्या स्वप्नातही गुंतून पडू नका. सतत वर्तमानवर लक्ष केंद्रित करा.
- तथागत बुद्ध
सूर्य, चंद्र, आणि सत्य या तीन गोष्टी कुठल्याही स्थितीत अधिक काळ लपून राहू शकत नाही.
स्वतःवर विजय मिळवणे हे हजार युद्ध जिंकण्यापेक्षा श्रेयस्कर आहे; कारण हा विजय फक्त तुमचा असतो.
- तथागत बुद्ध
कामोपभोगांमध्ये आसक्त होणे आणि स्वतःला क्लेश देने, ही दोन्ही टोके टाळणारा मध्यम मार्ग स्वीकारावा.
- तथागत बुद्ध
No comments:
Post a Comment